दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई रखडल्याने सभा तहकूब सभापती किरण थोरे व डॉ. भारती पवारांचा आरोप
By Admin | Updated: January 18, 2015 01:48 IST2015-01-18T01:47:23+5:302015-01-18T01:48:40+5:30
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई रखडल्याने सभा तहकूब सभापती किरण थोरे व डॉ. भारती पवारांचा आरोप

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई रखडल्याने सभा तहकूब सभापती किरण थोरे व डॉ. भारती पवारांचा आरोप
नाशिक : ठेंगोंडा येथील गर्भवती महिला सोनाली भास्कर यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याने जिल्हा परिषदेची आरोग्य समितीची सभा काल शनिवारी (दि.१७) तहकूब करण्यात आली. सभापती किरण पंढरीनाथ थोरे यांच्या उपस्थितीत आरोग्य समितीची मासिक बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच सदस्य डॉ. भारती पवार यांनी ठेंगोंडा येथील गर्भवती महिला सोनाली भास्कर यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची व फौजदारी कारवाई झाली काय? अशी विचारणा केली. सभापती किरण थोरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता निलंबनाच्या कार्यवाहीसंदर्भात प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. वाकचौरे यांनी दिली. त्यावर कारवाई का झाली नाही, अशी विचारणा डॉ. भारती पवार व किरण थोरे यांनी करीत आरोग्य समितीचे पुढील कामकाज बंद करा, अशी सूचना केल्याने बैठक तहकूब करण्यात आली. विशेष म्हणजे यासंदर्भात नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही सदस्यांनी हा प्रश्न लावून धरीत दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती. (प्रतिनिधी)