शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

मध्यस्थीनंतर सराफ बाजारातील बहिष्कार मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 1:10 AM

फुुलबाजारातील सुलभ शौचालय हटवेपर्यंत मतदानावर बहिष्कार घालण्याचा पवित्रा परिसरातील नागरिकांनी स्वीकारला होता. मात्र, प्रशासनाच्या वतीने सरकारवाडा पोलीस निरीक्षकांनी मागण्या प्रशासनाकडे मांडून आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तेथील नागरिकांनी आंदोलन मागे घेत मतदान केले.

नाशिक : फुुलबाजारातील सुलभ शौचालय हटवेपर्यंत मतदानावर बहिष्कार घालण्याचा पवित्रा परिसरातील नागरिकांनी स्वीकारला होता. मात्र, प्रशासनाच्या वतीने सरकारवाडा पोलीस निरीक्षकांनी मागण्या प्रशासनाकडे मांडून आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तेथील नागरिकांनी आंदोलन मागे घेत मतदान केले.सराफ बाजार, शुक्ल गल्ली आणि दहीपुलातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते सुलभ शौचालय अत्यंत हानीकारक ठरत आहे. विशेषत्वे पावसाळ्यात आणि पुराचे पाणी सर्वदूर पसरल्यावर त्या शौचालयामुळे आरोग्याची समस्या गंभीर होत चालली आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक स्तरावर निवेदने देऊनही प्रश्न सोडवला जात नसल्याने मतदानावर बहिष्काराचे हत्यार उपसण्यात आले होते.आनंद गर्गे, प्रकाश पगारे, किशोर पाठक, मनोज लुनावत, हेमंत जगताप, निनाद नांदुर्डीकर, विजय राऊत, दत्तात्रय राऊत, सत्यम शाह, चेतन राजापूरकर आदी कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत नागरिकांना मतदान न करण्याचे आवाहन करीत तशा आशयाचे फलकदेखील परिसरात लावले.मतदारांनी बहिष्कार टाकल्याची माहिती मिळताच प्रशासनाकडून त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. सरकारवाडाचे पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी सर्व मतदारांच्या मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी प्रशासनापर्यंत पोहोचवून आवश्यक ते सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा मागे घेतला. त्यानंतर नागरिकांनी सुरळीतपणे मतदान केल्याने प्रशासनाचा जीव भांड्यात पडला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik-central-acनाशिक मध्यVotingमतदान