आठ महिन्यांच्या भटकंतीनंतर मेढपाळांना घराची ओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 10:34 PM2019-07-06T22:34:17+5:302019-07-06T22:34:34+5:30

पांडाणे : आठ महिन्यांच्या भटकंतीनंतर धुळे जिल्ह्यातील मेंढपाळांना घराकडलची ओढ लागली असून, आम्ही अजून सहा ते सात दिवसांनी आमच्या गावी जाणार असल्याचे मत दोनशे पशुधनाचे मालक त्र्यंबक भिका गोरे, ता. साक्र ी, जि. धुळे यांनी सांगितले.

 After eight months of wander, the posterity of the posterity of the house | आठ महिन्यांच्या भटकंतीनंतर मेढपाळांना घराची ओढ

आठ महिन्यांच्या भटकंतीनंतर मेढपाळांना घराची ओढ

Next
ठळक मुद्देपशूधन । यावर्षी उन्हाळ्याच्या तीन महिन्यात करावा लागला संघर्ष

पांडाणे : आठ महिन्यांच्या भटकंतीनंतर धुळे जिल्ह्यातील मेंढपाळांना घराकडलची ओढ लागली असून, आम्ही अजून सहा ते सात दिवसांनी आमच्या गावी जाणार असल्याचे मत दोनशे पशुधनाचे मालक त्र्यंबक भिका गोरे, ता. साक्र ी, जि. धुळे यांनी सांगितले.
गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात अतिअल्प पाऊस झाल्यामुळे आम्ही दिवाळीनंतर मेंढ्या घेऊन कळवण, देवळा, दिंडोरी, पेठ तालुक्यात भटकंती केली.
यावर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यात मेंढ्यांना चारा व पाण्याचा प्रश्न खूप बिकट बनला होता. आम्ही आॅक्टोबर महिन्यात घर सोडल्यानंतर तीन महिने देवळा व कळवण तालुक्यात पशुधन जगवतो. तेथून जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत दिंडोरी तालुक्यात टमाटा पिकाची शेती रिकामी होते. तेव्हा आमचा मुक्काम दिंडोरी तालुक्यात असतो. एप्रिल, मे व जून महिना सुरगाणा व पेठ तालुक्यात आम्ही आमचे पशुधन चारतो. असे डोलबारे, ता. सटाणा येथील मेंढीपाळ जयराम देणकर सांगितले.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात लामकानी, डोमकानी, जैताणे, खुडाणे या भागात शेळी - मेंढी चारण्यासाठी मोठे जंगल असून, गेल्या वर्षी दुष्काळ असल्यामुळे पशुधन कसे जगवायचे असा प्रश्न पडला होता; परंतु नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यांमुळे आमचे एक ते दीड हजार पशुधन वाचवल्याचे त्र्यंबक गोरे यांनी सांगितले.

फोटो ? ) जयराम देणकर डोलबारे ( खुन डोक्यात टोपी गळ्यात ? पान )
? ) त्र्यंबक गोरे साक्र ी, जि.धुळे ( डोक्यावर फेटा )

Web Title:  After eight months of wander, the posterity of the posterity of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी