नाशिक : कळसूबाई व हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात राज्यप्राणी शेकरूंची संख्या गेल्या वर्षापासून वाढत आहे. नाशिक वन्यजीव विभागाकडून या क्षेत्राच्या परिसरात गठित करण्यात आलेल्या ग्राम परिस्थितीकीय विकास समित्यांचे हे फलित असल्याचे मानले जात आहे. पंधरवड्यानंतर अभयारण्य क्षेत्रात ‘शेकरू’ची गणना शास्त्रोक्त पध्दतीने सुरू होणार आहे.
भीमाशंकरनंतर कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वाढतोय राज्यप्राणी शेकरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 22:14 IST
नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्राच्या हद्दीमधील वृक्षसंपदा असलेल्या देवरायांमध्ये शेकरूची चांगली जोपासणा होत आहे.
भीमाशंकरनंतर कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वाढतोय राज्यप्राणी शेकरु
ठळक मुद्देदेवरायांमध्ये शेकरूची चांगली जोपासणा कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्राचा परिसर शेकरूंसाठी पोषकआदिवासी लोकसंस्कृती-निसर्ग प्रेमामुळे वन्यजीवांचे संवर्धन