शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

आरतीसाठी आले अन् कारवाई करुन गेले; तुकाराम मुंढेंचा मंदिराबाहेरील दुकानदारांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 1:27 PM

प्लॅस्टिकचा वापर मंदिराच्या आवरात होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांना दिल्या. यावेळी पाटील यांनी त्यांना इको-फ्रेण्डली पिशव्या ज्या मंदिर संस्थानाकडून तयार करण्यात आल्या आहेत, त्या दाखविल्या.

ठळक मुद्दे बुधवार संध्याकाळपर्यंतचा ‘अल्टीमेटम’ मुंढे यांनी विक्रेत्यांना दिलाविक्रेत्यांनी प्लॅस्टिकचा केलेला वापर बघून ते प्रचंड भडकले.

नाशिक : नवरात्रोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी महापौर रंजना भानसी यांच्यासह मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना ग्रामदेवता कालिका मातेच्या मंदिरात आरतीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मंदिरात प्रवेश करताच प्लॅस्टिकचा बेसुमार वापर यात्रोत्सवात होत असल्याचे बघून मुंढे यांचा पारा चढला. त्यांनी आरती पार पाडल्यानंतर मंदिर संस्थानाच्या विश्वस्तांनाही धारेवर धरत परिसरातील विक्रेत्यांना संध्याकाळपर्यंतचा ‘अल्टीमेटम’ दिला.मुंढे यांना सकाळी आरतीसाठी कालिका मंदिरात बोलविण्यात आले होते. आरतीचा मान मुंढे यांनी स्विकारला खरा; मात्र आरती झाल्यानंतर त्यांनी अचानकपणे मंदिराच्या आवारात उभारलेल्या विविध प्रसाद व खाद्यपदार्थांच्या दुकानांना भेट दिली. यावेळी विक्रेत्यांनी प्लॅस्टिक पिशव्यांसह वेष्टणांसाठीदेखील प्लॅस्टिकचा केलेला वापर बघून ते प्रचंड भडकले. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नुकताच प्लॅस्टिकचा वापर ज्या दुकानात आढळून येईल, ते दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई केली जाईल, असे आदेश दिले आहे. या पार्श्वभूमीवर मुंढे यांनी येथील विक्रेत्यांशी संवाद साधत त्यांना याबाबत कल्पना दिली. बुधवार संध्याकाळपर्यंतचा ‘अल्टीमेटम’ मुंढे यांनी विक्रेत्यांना दिला. तातडीने सर्व विक्रेत्यांनी प्लॅस्टिकचा होणारा वापर बंद करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यानंतर मंदिराचे विश्वस्तांनाही त्यांनी कल्पना देत धारेवर धरले. प्लॅस्टिकचा वापर मंदिराच्या आवरात होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांना दिल्या. यावेळी पाटील यांनी त्यांना इको-फ्रेण्डली पिशव्या ज्या मंदिर संस्थानाकडून तयार करण्यात आल्या आहेत, त्या दाखविल्या. या पिशव्या भाविकांना प्रसाद व पूजा साहित्यासाठी मोफत देत असल्याचे सांगितले.रहदारीला अडथळा खपवून घेणार नाहीतुकाराम मुंढे हे कायदेशीर कारवायांसाठी प्रसिध्द असून त्यांनी यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी विक्रेत्यांना ठणकावून सांगितले. रहदारीला कु ठल्याही प्रकारचा अडथळा, प्लॅस्टिकचा वापर खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट सूचना दिल्या. मंदिराच्या परिसरात रस्त्याच्या केवळ एका बाजूला दूकाने थाटण्याची परवानगी दिली असून मर्यादित जागेतच सीमा लक्षात घेऊन स्टॉल्स उभारावे, असे त्यांनी यावेळी विक्रेत्यांना सांगितले. रस्त्यावर अतिक्रमण वाढविल्यास धडक कारवाई केली जाईल, असे मुंढे यांनी विक्रेत्यांना यावेळी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकPlastic banप्लॅस्टिक बंदीtukaram mundheतुकाराम मुंढेRamdas Kadamरामदास कदम