After 33 years of school life, | तब्बल ३३ वर्षांनी भेटले शालेय जीवनातील सवंगडी
तब्बल ३३ वर्षांनी भेटले शालेय जीवनातील सवंगडी

सिन्नर : शालेय जीवनातील अनेक प्रसंगांच्या एक ना अनेक आठवणींना उजाळा देत तब्बल ३३ वर्षांनंतर लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयातील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्मृतिगंध दरवळला.
पंचवटी मोटेल्समधील सभागृहामध्ये वाजे विद्यालयातील १९८६ च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. ३३ वर्षांनंतर म्हणजे वयाच्या पन्नाशीत मित्र-मैत्रिणींच्या भेटी झाल्या. विद्यार्थिदशेतील परिस्थिती, प्रसंग आठवत नव्याने ओळख करून द्यावी लागत होती. पती, पत्नी, मुलंबाळं, नोकरी, व्यवसाय आदी विषयांवर चर्चा होऊ लागली. ओळख करून देताना गंमत येत होती.


Web Title: After 33 years of school life,
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.