शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
3
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
4
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
5
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
6
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
7
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
8
एक नंबर! गोड खाऊनही कमी करता येतं वजन; फक्त माहीत असायला हवी योग्य वेळ अन् पद्धत
9
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
10
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
11
Shravan Shukravar 2025: श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी भरा देवीची ओटी आणि 'असा' मागा जोगवा!
12
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
13
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
14
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
15
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
16
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
17
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
18
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
19
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
20
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल

प्रशासकांनी दिली बॅँकेच्या कर्मचा-यांना कर्ज वसुलीची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 14:42 IST

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कामकाजात यामागे काय झाले त्यापेक्षा आता पुन्हा बॅँकेला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच सभासद, शेतक-यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी कामकाजात सुधारणा घडवून प्राधान्याने जिल्हा बॅँकेची थकीत वसुली करावी अशी तंबी जिल्हा बॅँकेचे प्रशासक तथा विभागीय सह निबंधक मिलींद भालेराव यांनी ...

ठळक मुद्देनाशिक जिल्हा बॅँक : विभागीय निबंधकांनी साधला संवाद २७०० कोटी रूपये विविध माध्यमातून येणे बाकी

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कामकाजात यामागे काय झाले त्यापेक्षा आता पुन्हा बॅँकेला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच सभासद, शेतक-यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी कामकाजात सुधारणा घडवून प्राधान्याने जिल्हा बॅँकेची थकीत वसुली करावी अशी तंबी जिल्हा बॅँकेचे प्रशासक तथा विभागीय सह निबंधक मिलींद भालेराव यांनी दिली आहे.शनिवारी जिल्हा बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर भालेराव यांनी प्रशासकपदाची सुत्रे स्विकारली व काही काळ बॅँकेत थांबल्यानंतर ते रवाना झाले होते. सोमवारी बॅँकेचे कामकाज सुरू झाल्यानंतर छोटेखानी समारंभात भालेराव यांनी बॅँकेचे अधिकारी व कर्मचा-यांशी संवाद साधला. जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाने गेल्या दोन वर्षात केलेल्या कामकाजामुळे बॅँकेवर ही परिस्थिती ओढविली व परिणामी संस्थेवर प्रशाासक नेमण्याचा कटू निर्णय रिझर्व्ह बॅँकेला घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगून, बॅँकेचे कामकाज अधिकाधिक पारदर्शी कसे होईल याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. बॅँकेची आर्थिक परिस्थिती, देणी याचा विचार करता, बॅँकेने यापुर्वी वाटलेले कर्ज वसुली कशी होईल याकडे सर्वांनी लक्ष घालावे, साधारणत: २७०० कोटी रूपये विविध माध्यमातून येणे बाकी असून, शेतकरी कर्जमाफीतून बॅँकेला ५०० ते ६०० कोटी रूपये मिळतील परंतु ते बॅँकेचे आर्थिक व्यवहार सुरूळीत करण्यासाठी पुरेसे नाहीत, त्यामुळे उर्वरित २२०० कोटी रूपयांची वसुली करण्याची जबाबदारी सर्व कर्मचारी, अधिका-यांची असून, प्राधान्याने ते काम हाती घ्यावे लागेल अशी तंबीच त्यांनी भरली. अशी वसुली करतांना कोणाच्या दबावाला अथवा राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता निर्भयपणे कामकाज करा असा सल्ला देतानाच स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी व बॅँकेचे भवितव्य कायम ठेवण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागले तरी ते घ्यावे लागतील असे सांगून त्यांनी भविष्यातील वाटचालीचे संकेत दिले. यावेळी बॅँकेचे व्यवस्थापक राजेंद्र बकाल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :BanerबाणेरNashikनाशिक