विंचूर, येवला औद्योगिक क्षेत्रातील पाणीयोजनेस प्रशासकीय मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 23:19 IST2022-03-28T23:18:52+5:302022-03-28T23:19:48+5:30
विंचूर : विंचूर व येवला औद्योगिक क्षेत्रासाठी एकत्रित वाढीव पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. या योजनेच्या कामासाठी एकूण २० कोटी ९८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

विंचूर, येवला औद्योगिक क्षेत्रातील पाणीयोजनेस प्रशासकीय मान्यता
विंचूर : विंचूर व येवला औद्योगिक क्षेत्रासाठी एकत्रित वाढीव पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. या योजनेच्या कामासाठी एकूण २० कोटी ९८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
विंचूर व येवला येथील चिचोंडी येथे औद्योगिक वसाहत विकसित करण्यात आली आहे. या औद्योगिक वसाहतीत उद्योगांसाठी विविध पायाभूत सोयीसुविधा विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे याठिकाणी विविध नवनवीन उद्योग येण्यासाठी मदत होणार आहे. या दोनही औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात येऊन उद्योगांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी २० कोटी ९८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. येवला औद्योगिक वसाहतीमधील रस्ते, सांडपाणी, पाणीपुरवठा या पायाभूत सोयी तयार झाल्या आहेत. भविष्यातील वाढती गरज लक्षात घेऊन याठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी या दोनही वसाहतीत वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली आहे. त्यामुळे येथील उद्योगांना गरजेनुसार पाणी उपलब्ध होणार असून उद्योगांचा अधिक विकास होणार आहे. त्यातून परिसरातील नागरिकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद देखील करण्यात आलेली असून लवकरच या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.