कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाचा अ‍ॅक्शन प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:28 IST2020-07-03T21:29:23+5:302020-07-04T00:28:18+5:30

सिन्नर शहरासह तालुक्यात वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या काळजी वाढवणारी असली तरी प्रशासनाने या लढाईसाठी पुन्हा एकदा कंबर कसली असून, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून त्याची सोमवारपासून अंमलबजावणीदेखील सुरू केली असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली.

Administration's action plan to prevent corona | कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाचा अ‍ॅक्शन प्लॅन

कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाचा अ‍ॅक्शन प्लॅन

ठळक मुद्देसिन्नर : लग्नसमारंभ व वाढदिवसावर राहणार नजर

सिन्नर : शहरासह तालुक्यात वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या काळजी वाढवणारी असली तरी प्रशासनाने या लढाईसाठी पुन्हा एकदा कंबर कसली असून, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून त्याची सोमवारपासून अंमलबजावणीदेखील सुरू केली असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली.
आमदार माणिकराव कोकाटे व उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी १५ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामस्तरीय समिती, पर्यवेक्षण अधिकारी व तालुकास्तरीय समिती अशी त्रिस्तरीय कार्यपद्धतीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये येणारे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची तपासणी करून त्यांच्या नोंदी ठेवण्यात येत आहे. लग्नसमारंभासाठी ठरवून दिलेले ५० पेक्षा अधिक व्यक्तींची मर्यादा मोडल्यास संबंधित मंगल कार्यालयाचे चालक, वधू-वर पक्षातील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. याशिवाय तालुक्यातील सर्व बेकरीचालकांकडून विक्री होणाºया वाढदिवसाच्या केकबाबत खरेदी करणाऱ्यांचे नाव व पत्ता तात्काळ स्थानिक प्रशासनास देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. दुचाकी व चारचाकी वाहनांवर प्रवास करणाºया व्यक्तींची तपासणी करून दुचाकीवर एक व्यक्ती व चारचाकी वाहनांमध्ये चालकासहित तीन व्यक्ती यापेक्षा जास्त प्रवासी असल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहे. त्याअंतर्गत तहसीलदार राहुल कोताडे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांना पत्र देऊन विवाह, अंत्यविधी, दशक्रिया विधीस उपस्थितीत राहू नये, असे लेखी पत्र दिले आहे. या कार्यक्रमांना गर्दी होत असते. लोकप्रतिनिधी या कार्यक्रमांना हजर राहिल्यास उपस्थितीतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आमदारांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहू नये, असे लेखी पत्र तहसीलदारांनी आमदार माणिकराव कोकाटे यांंना दिले आहे.
शहरातील आठ व ग्रामीण भागातील २६ कंटेन्मेंट झोनमध्ये घरोघर जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. ग्रामीण भागात ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे व विविध आजारांनी ग्रस्त आहेत. आजाराने ग्रत दहा हजार २२१ व्यक्तींची नोंदणी करण्यात आलेली आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यासाठी १२३ पथके स्थापन केली आहे. शहरात व्यापाºयांनी स्वयंस्फूर्तीने चार दिवस बंद पाळण्यात आला आहे. या कालावधीमध्ये नागरिक घरात थांबणार असल्याने सर्व्हे आरोग्य विभागाच्या वतीने पूर्ण करण्यात येणार आहे.

Web Title: Administration's action plan to prevent corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.