तहसीलदारांच्या पदभाराला अखेर सापडला मुहूर्त निफाडची सूत्रे प्रशासकांकडे,
By Admin | Updated: April 7, 2015 01:52 IST2015-04-07T01:52:13+5:302015-04-07T01:52:43+5:30
तहसीलदारांच्या पदभाराला अखेर सापडला मुहूर्त निफाडची सूत्रे प्रशासकांकडे,

तहसीलदारांच्या पदभाराला अखेर सापडला मुहूर्त निफाडची सूत्रे प्रशासकांकडे,
नाशिक : जिल्'ातील सात ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपरिषद / नगरपंचायतींमध्ये होऊन ग्रामपंचायतींचा पदभार प्रशासक म्हणून स्वीकारण्यास स्थानिक तहसीलदारांना मुहूर्त सापडला असून, काल (दि.६) निफाडचे तहसीलदार सुनील अहेर यांनी ग्रामपंचायतीच प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला आहे. दरम्यान, यासंदर्भात शनिवारीच (दि.४) दै. लोकमतमध्ये ‘नगर तंदुरस्त, नाशिक मात्र सुस्तच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून अहमदनगर जिल्'ातील तहसीलदारांनी प्रशासक पदाचा पदभार स्वीकारण्याची कार्यवाही केल्याचे स्पष्ट केले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच त्याची तातडीने जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सातपैकी सहा तहसीलदारांना शासनाच्या आदेशानुसार संबंधित ग्रामपंचायतींचे प्रशासक म्हणून सूत्रे स्वीकारण्यासंदर्भात आदेश काढले होते. त्यामुळेच काल (दि.६) तातडीने निफाडचे तहसीलदार सुनील अहेर यांनी निफाड ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून पदभार स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.