मोफत पाठ्यपुस्तक योजनेतील बदलांचा फेरबदल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:18 IST2017-11-01T00:03:33+5:302017-11-01T00:18:42+5:30
सर्वशिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणाºया मोफत पाठ्यपुस्तक योजनेत शिक्षण विभागाने बदल केल्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, मनविसेने यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांना निवेदन सादर करीत शिक्षण विभागाने या निर्णयासंबंधी फेरविचार करण्याची मागणी केली आहे. तसेच या योजनेत बदल झाल्यास मनसेस्टाइल आंदोलन करण्याचा इशाराही मनविसेने दिला आहे.

मोफत पाठ्यपुस्तक योजनेतील बदलांचा फेरबदल करा
नाशिक : सर्वशिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणाºया मोफत पाठ्यपुस्तक योजनेत शिक्षण विभागाने बदल केल्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, मनविसेने यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांना निवेदन सादर करीत शिक्षण विभागाने या निर्णयासंबंधी फेरविचार करण्याची मागणी केली आहे. तसेच या योजनेत बदल झाल्यास मनसेस्टाइल आंदोलन करण्याचा इशाराही मनविसेने दिला आहे. सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून मोफत वाटप करण्यात येणाºया पाठ्यपुस्तक योजनेत शिक्षण विभागाने बदल करून थेट ठ्यपुस्तकाऐवजी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातील, असे जाहीर केल्यामुळे आता विद्यार्थ्यांना बँकेत खाते खोलने बंधनकारक झाले आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यही यामुळे धोक्यात येण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे सदर योजनेचा फेरविचार करावा अन्यथा मनसेस्टाइल आंदोलन करण्याचा इशाराही मनविसेने दिला आहे. तसेच पाठ्यपुस्तके योजना आहे त्याच स्वरूपात चालू ठेवण्याची मागणीही मनविसेने शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष श्याम गोहाड, अतुल धोंगडे, अमर जमधडे, नितीन धानापुणे, शशिकांत चौधरी, प्रसाद घुमरे, स्वप्नील कराड, आदित्य कुलकर्णी, अमित पाटील, सूरज नलावडे आदी उपस्थित होते.
अनेकांची आर्थिक क्षमता नाही
विद्यार्थ्यांच्या पालकांच्या पदरचे पैसे खर्च करून पाठ्यपुस्तकांची खरेदी करून पावती सादर केल्यानंतर पैसे मिळणार आहे. परंतु अनेकजण आर्थिक क्षमता नसतानाही केवळ मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके मिळत असल्याने मुलांना शाळेत पाठवतात. अशा पालकांनी खात्यांवर पैसे येण्याआधी पाठ्यपुस्तके खरेदी कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच पाठ्यपुस्तकांचे पैसे पालकांच्या खात्यावर जमा होण्यास तांत्रिक अडथळा निर्माण झाल्यास दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्नही निवेदनातून उपस्थित केला आहे. पालकांकडे पैसे नसल्यामुळेच ही योजना सुरू करण्यात आली होती.