युवक महोत्सवात आदिवासी नृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 17:48 IST2018-11-13T17:47:41+5:302018-11-13T17:48:10+5:30

डांगसौदाणे - सावित्रीबाई फुले विद्यापिठाच्या विभागीय जिल्हास्तरिय युवक महोत्सवात येथील सप्तश्रृंगी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विदयार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून व्दितीय क्र मांक मिळविला

Adivasi dance at youth festival | युवक महोत्सवात आदिवासी नृत्य

युवक महोत्सवात आदिवासी नृत्य

डांगसौदाणे - सावित्रीबाई फुले विद्यापिठाच्या विभागीय जिल्हास्तरिय युवक महोत्सवात येथील सप्तश्रृंगी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विदयार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून व्दितीय क्र मांक मिळविला.
सावित्रीबाई फुले विद्यापिठाच्या विभागीय /जिल्हास्तरिय युवक महोत्सवाचे आयोजन लासलगांव येथील नुतन विद्याप्रसारक मंडळाचे,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगांव येथे करण्यात आले होते. या आदीवासी लोकनृत्यात निकिता पगार,शिवांजली सोनवणे,राजश्री सोनवणे,कावेरी कुवर,दिनेश ठाकरे,ईश्वर गांगुर्डे,राजू पवार नानाजी सोनवणे या विद्यार्थ्यांनी प्रा.राजाराम नाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग नोंदविला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय सोनवणे,सचिव सुशिलकुमार सोनवणे,किरण हिरे,प्राचार्य पांडूरंग जाधव आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 

 

Web Title: Adivasi dance at youth festival

टॅग्स :danceनृत्य