नुकसानग्रस्त भागाची आदित्य ठाकरे यांच्याकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 15:18 IST2019-11-04T15:17:38+5:302019-11-04T15:18:19+5:30
वडनेरभैरव : सरसकट कर्जमाफीसह वीजबिल वसुली थांबविण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी विविध समस्यांचा पाडाच शिवसेनेचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडला.

नुकसानग्रस्त भागाची आदित्य ठाकरे यांच्याकडून पाहणी
वडनेरभैरव : सरसकट कर्जमाफीसह वीजबिल वसुली थांबविण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी विविध समस्यांचा पाडाच शिवसेनेचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडला. ठाकरे यांनी सोमवारी जिल्ह्यातील विविध नुकसानग्रस्त भागांना भेटी दिल्या. प्रारंभी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे भेट दिली. वडनेरभैरव येथील सुशीलाबाई रघुनाथ दांडेकर यांच्या द्राक्षबागेची पाहणी केली. यावेळी शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे, राज्यमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, आमदार सुहास कांदे, नरेंद्र दराडे, माजी आमदार अनिल कदम, प्रांताधिकारी सिद्धांत भंडारे , तहसीलदार संदीप पाटील, तालुका कृषीअधिकारी, राजेंद्र साळुंखे, भारती जाधव ,कारभारी आहेर, जगन राउत, शिवसेना तालुका अध्यक्ष शांताराम ठाकरे, विलास भवर, संपत वक्ते, विजय निखाडे, बाबाजी सलादे, अनिल कोठुळे, बाळासाहेब माळी, बाळासाहेब दांडेकर, नाना वाटपाडे, संजय पाचोरकर, संजय पुरकर, नवनाथ शिंदे, विजय पुरकर, दत्तात्रेय माळी, विजय वक्ते आदि उपस्थित होते.