अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक होले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 01:45 IST2018-09-02T01:45:04+5:302018-09-02T01:45:46+5:30

नाशिक : जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ गजानन एम़ होले यांचे शनिवारी (दि़१) सकाळी निधन झाले़

Additional District Surgeon Hole passes away | अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक होले यांचे निधन

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक होले यांचे निधन

ठळक मुद्दे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते़


नाशिक : जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ गजानन एम़ होले यांचे शनिवारी (दि़१) सकाळी निधन झाले़ कर्करोगाने ग्रस्त असलेल्या होले यांच्यावर गत काही महिन्यांपासून उपचार सुरू होते़ त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे़ नागपूरमधून वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर १९८६ साली ते आरोग्यसेवेत दाखल झाले होते़
१९९७ पर्यंत वर्धा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, यानंतर मुंबई, दिंडोरी ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, मनमाड उपजिल्हा रुग्णालयात सेवा केली़ २०१३ पासून ते जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदावर कार्यरत होते़ कर्करोगाने ग्रस्त असलेल्या होले यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते़ शनिवारी त्यांचा मृत्यू झाला़

Web Title: Additional District Surgeon Hole passes away