त्र्यंबकेश्वर तालुक्यात ८ नवीन पॉझिटिव्ह रु ग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:05 PM2020-06-30T17:05:34+5:302020-06-30T17:08:09+5:30

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील कोरोना कोव्हीड-१९ चे पॉझिटिव्ह रु ग्णांच्या वाढत्या संख्येने त्र्यंबकेश्वरकरांची झोप उडविली आहे. त्र्यंबकेश्वर मधील पॉझिटिव्ह रु ग्णासह त्यांच्याच परिवारातील क्वारंटाईन केलेल्या पैकी एकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला. तर हरसुल येथील पहल्या सात पैकी पुन्हा नव्याने सहा रु ग्ण पॉझिटिव्ह दाखविण्यात आले आहेत. तसेच कोरोना आता खेड्या-पाड्यात देखील शिरकाव करीत आहे. सोमवारी (दि.२९) वावीहर्ष येथील एक पुरु ष कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. दरम्यान तालुक्यात चार कन्टेन्मेन्ट झोनपैकी तीन कन्टेन्मेन्ट झोन कार्यरत आहेत.

Addition of 8 new positive patients in Trimbakeshwar taluka | त्र्यंबकेश्वर तालुक्यात ८ नवीन पॉझिटिव्ह रु ग्णांची भर

त्र्यंबकेश्वर तालुक्यात ८ नवीन पॉझिटिव्ह रु ग्णांची भर

Next
ठळक मुद्देआतापर्यंत हरसुल १३, त्र्यंबकेश्वर ४, वावीहर्ष १असे १८ रु ग्ण

लोकमत न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील कोरोना कोव्हीड-१९ चे पॉझिटिव्ह रु ग्णांच्या वाढत्या संख्येने त्र्यंबकेश्वरकरांची झोप उडविली आहे.
त्र्यंबकेश्वर मधील पॉझिटिव्ह रु ग्णासह त्यांच्याच परिवारातील क्वारंटाईन केलेल्या पैकी एकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला. तर हरसुल येथील पहल्या सात पैकी पुन्हा नव्याने सहा रु ग्ण पॉझिटिव्ह दाखविण्यात आले आहेत. तसेच कोरोना आता खेड्या-पाड्यात देखील शिरकाव करीत आहे. सोमवारी (दि.२९) वावीहर्ष येथील एक पुरु ष कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. दरम्यान तालुक्यात चार कन्टेन्मेन्ट झोनपैकी तीन कन्टेन्मेन्ट झोन कार्यरत आहेत.
ब्रम्हाव्हॅली क्वारंटाईन कक्षात सध्या ३६ रु ग्ण अ‍ॅडमिट असुन ४० ते ४५ रु ग्ण होम क्वारंटाईन करु न ठेवले आहेत. ब्रम्हाव्हॅली येथे ५ पॉझिटिव्ह रु ग्ण, सिव्हील मध्ये १ व खाजगी रु ग्णालयात ५ पॉझिटिव्ह रु ग्ण उपचार घेत आहेत. अशी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सद्यस्थिती आहे. त्र्यंबकेश्वर हरसुल शहरात १० दिवस स्वेच्छेने कर्फ्यू पाळला जात असुन आजच्या पालखी प्रस्थाना समयी किमान ३०० लोक त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ उपस्थित होते. कोणीही उत्साहाच्या भरात फिजिकल डिस्टिन्संग पाळण्याच्या मनिस्थतीत नव्हता. एरवी देखील रात्रीच्या वेळेस 04, 01, 05 अशा विविध ठिकाणा वरु न गाड्या येत असल्याचे बोलले जात आहे. काही लोक तर रात्री गाड्या घेउन भाजी खरेदीसाठी येत असल्याचेही बोलले जात आहे. अर्थात कदाचित या अफवा देखील असु शकतात. तरीही लोकांनी आपली व कुटुंबातील इतरांची काळजी घ्या. सरकारी नियमांचे पालन करा. असे आवाहन तहसिलदार दीपक गिरासे यांनी दिली आहे.

Web Title: Addition of 8 new positive patients in Trimbakeshwar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.