युवा दिन जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST2021-08-13T04:18:27+5:302021-08-13T04:18:27+5:30

मालेगाव: कॅम्पातील मराठी अध्यापक विद्यालय संलग्न सराव पाठशाळा येथे आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त प्रा. डॉ. लहानू जाधव यांचे व्याख्यान झाले. ...

Add youth day | युवा दिन जोड

युवा दिन जोड

मालेगाव: कॅम्पातील मराठी अध्यापक विद्यालय संलग्न सराव पाठशाळा येथे आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त प्रा. डॉ. लहानू जाधव यांचे व्याख्यान झाले. त्यांनी

तरुणाईने मोबाईलचा योग्य तो वापर करून आपल्या शिक्षण व आरोग्य यावर भर देऊन आपले ध्येय निश्चित करावे. आपला आदर्श भावी पिढी समोर ठेवावा असे सांगितले.

प्राचार्य व्ही.डी. सोनवणे यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक छात्र अध्यापिका जया खेडकर व शिरीन पिंजारी यांनी केले. तर आभार सीमा जाधव यांनी केले.

–----–---------------

एसपीएच विद्यालय मालेगाव; येथील एस.पी.एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (म्युनिसिपल) येथे व्याख्यानमाला व निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. प्राचार्या कल्पना देसले यांनी मार्गदर्शन केले.

गौरी महाजन यांचे व्याख्यान झाले. पर्यवेक्षक एन.एम. सोनावणे, शिक्षक, उज्ज्वला मेधने उपस्थित होत्या. सूत्रसंचलन व प्रास्ताविक श्रीमती सी. एम साळुंके यांनी केले. -------------------–------------------------के.बी. एच. टाकळी मालेगाव: तालुक्यातील टाकळी येथील केबीएच विद्यालयात अध्यक्षस्थानी

मुख्याध्यापक एम.पी. शिंदे होते. वर्धा येथील तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, शारदा जाधव, मृणाली पवार यांनी प्रतिमा पूजन केले. तहसीलदार सूर्यवंशी यांचे व्याख्यान झाले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन डी.एस. सावंत यांनी केले. आभार पी.डी. मांडवडे यांनी मानले.

Web Title: Add youth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.