आदर्श शिक्षक पुरस्काराचा चेंडू आयुक्तांच्या दरबारी

By Admin | Updated: September 4, 2014 00:05 IST2014-09-03T22:56:59+5:302014-09-04T00:05:02+5:30

आदर्श शिक्षक पुरस्काराचा चेंडू आयुक्तांच्या दरबारी

Adarsh ​​Teacher Award Over Commissioner's Court | आदर्श शिक्षक पुरस्काराचा चेंडू आयुक्तांच्या दरबारी

आदर्श शिक्षक पुरस्काराचा चेंडू आयुक्तांच्या दरबारी

 

नाशिक : दरवर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्काराबाबतची घोषणा बुधवारी (दि.३) झाली नाही. आता ही घोषणा शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येलाच (दि.४) होण्याची शक्यता आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तालुकानिहाय निवड करून प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत प्रत्येक तालुक्यातून तीन प्रस्ताव येणे अपेक्षित असून, १५ तालुक्यांतून २९ प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्याचे कळते. तसेच या वर्षापासून नव्यानेच महिला शिक्षकांना दिला जाणारा आदर्श सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातून एकेकच प्रस्ताव आल्याने जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार निवड समितीने आदर्श शिक्षक व सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्काराचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयुक्त कार्यालयातून या पुरस्कारांची घोषणा गुरुवारी (दि.४) होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Adarsh ​​Teacher Award Over Commissioner's Court