नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्यासाठी मराठवाड्यातील कार्यकर्ते धडकले गंगापूर धरणावर!
By संजय पाठक | Updated: November 20, 2023 14:31 IST2023-11-20T14:31:15+5:302023-11-20T14:31:35+5:30
या संदर्भात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात काही याचिका दाखल झाल्या आहेत.

नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्यासाठी मराठवाड्यातील कार्यकर्ते धडकले गंगापूर धरणावर!
नाशिक - मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आज नाशिकमधील गंगापूर धरणावर धडकले आहेत.
जायकवाडी धरणामध्ये सहा टीएमसी पाण्याचा कमी साठा असून त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि गोदावरी धरण समूहातून सहा टीएमसी पाणी सोडण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने आदेश दिले आहेत. मात्र आदेश देऊन पंधरा दिवसांनी कालावधी झाला आहे.
या संदर्भात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात काही याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे अद्याप या धरण समूहातील पाणी सोडण्यात आलेले नाही. मराठवाड्याची पाण्याची तहान भागवण्यासाठी आदेश पाळत नसल्याचे निमित्त करून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आज दुपारी गंगापूर धरणावर धडकले आहेत राज्य शासनाचा निषेध करत त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आहे.