जिल्ह्यात औषधे, खासगी रु ग्णालयांच्या बिलांचाकाळाबाजार केल्यास कारवाईचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:41 IST2020-07-10T17:40:52+5:302020-07-10T17:41:25+5:30
जिल्ह्यातील वाढत्या रु ग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये अधिकाधिक हॉस्पिटलचे बेड अधिग्रहित करण्यात येत आहेत. जिल्ह्यात औषधे किंवा खासगी रु ग्णालयांच्या बिलांचा कुणी काळाबाजार केल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल,

जिल्ह्यात औषधे, खासगी रु ग्णालयांच्या बिलांचाकाळाबाजार केल्यास कारवाईचा दणका
नाशिक : जिल्ह्यातील वाढत्या रु ग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये अधिकाधिक हॉस्पिटलचे बेड अधिग्रहित करण्यात येत आहेत. जिल्ह्यात औषधे किंवा खासगी रु ग्णालयांच्या बिलांचा कुणी काळाबाजार केल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर बोलताना दिला.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अधिक प्रमाणात लोकसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इगतपुरीच्या एसएमबीटी कॉलेज मध्ये १०० बेड राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व अधिग्रहित हॉस्पिटलचा खर्च शासनाच्या वतीने करण्यात येणार असून, त्यासाठी सहा कोटी रु पयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असल्यामुळे बाधितांचा आकडा वाढल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातदेखील आता अन्य आजारांनी बाधित असलेल्या कोमॉरबीट रु ग्णांना शोधून काढण्यास प्राधान्य दिले जात आहे. फडणवीस राज्यात दौरा करतात ही चांगली गोष्ट आहे. मात्र ते मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यात सरकारी अधिकाऱ्यांनी जाऊ नये, असे त्यांनीच आदेश काढल्याची आठवणदेखील भुजबळ यांनी करून दिली.