विना मास्क फिरणाऱ्यांवर जिल्ह्यात कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 08:37 PM2021-02-22T20:37:32+5:302021-02-23T23:51:56+5:30

सिन्नर/चांदवड : शहरात विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असून रविवारी (दि.२१) शहरातील विविध भागात व दुकानांमध्ये जाऊन विना मास्क आढळेल्या व्यक्तींकडून दंड वसूल करण्यात आला.

Action will be taken against those who walk without masks in the district | विना मास्क फिरणाऱ्यांवर जिल्ह्यात कारवाईचा बडगा

विना मास्क फिरणाऱ्यांवर जिल्ह्यात कारवाईचा बडगा

Next
ठळक मुद्दे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर, चांदवडमध्ये दंडात्मक कारवाई

सिन्नर तालुक्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शहरात पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये यासाठी नियमांची काटेकोरपणे नागरिकांनी अंमलबजावणी करावी असे आवाहन वेळोवेळी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकांना या संसर्गाचा सामना करावा लागला आहे. तरीदेखील नियमांची पायमल्ली करीत नागरिक बिनदिक्कतपणे विनामास्क शहरात फिरत आहेत. नागरिकांकडून होत असलेल्या हलगर्जीपणाला प्रतिबंध घालण्यासाठी रविवारी दिवसभर शहरात पोलीस व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी फिरून विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल केला आहे. लालचौक, शिवाजी चौक, नवापूल, नाशिक वेस, बारागाव पिंप्री रोड या भागासह मुख्यपेठेतील दुकानांमध्ये विनामास्क आढळणाऱ्या दुकानदारांकडून १०० रुपये दंड घेत मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात आले. मुख्याधिकारी संजय केदारे व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन आवारी, अमोल गाडे, विनायक आहेर यांच्यासह नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली.
चांदवडला दुचाकी वाहनचालकांना दणका
चांदवड : शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत ५८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस निरीक्षक समीर बारवकर, मुख्याधिकारी अभिजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व नगर परिेषदेच्या कर्मचाऱ्यांनी आठवडे बाजार, गणूर चौफुलीवर येथे दुचाकी वाहनधारक व चारचाकी वाहनधारक हे कोरोना संक्रमण अवस्थेतील दुसऱ्या टप्प्यात विनामास्क फिरताना आढळल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी पवन कस्तुरे, खंडू वानखेडे, संजय गुरव, वाल्मीक सकट, यशवंत बनकर, लखन धोत्ने, चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारावकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, हरिचंद्र पालवी, दीपक मोरे सहभागी झाले.
 

Web Title: Action will be taken against those who walk without masks in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app