शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

दांडी बहाद्दर निवडणूक कर्मचार्‍यांवर होणार कारवाई ; ५१ कर्मचार्‍यांना मिळणार नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 17:39 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या ५१ शिक्षकांनी दांडी मारून प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. या प्रकरणी शिक्षकांवर कारवाईसाठी बागलाणचे निवडणूक निर्णय अधिकारी शुभम गुप्ता यांनी गटशिक्षणाधिकारी यांना आदेश दिल्याने दांडी बहाद्दर शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यासाठी लेखी आदेश देण्यात आले होते.

सटाणा : बागलाण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या ५१ शिक्षकांनी दांडी मारून प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. या प्रकरणी शिक्षकांवर कारवाईसाठी बागलाणचे निवडणूक निर्णय अधिकारी शुभम गुप्ता यांनी गटशिक्षणाधिकारी यांना आदेश दिल्याने दांडी बहाद्दर शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.बागलाण तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषित करण्यात आल्यानंतर निवडणूक केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी इत्यादी कामांसाठी कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यासाठी लेखी आदेश देण्यात आले होते.त्या अनुषंगाने बागलाण तालुक्यातील शिक्षिकांना निवडणूक प्रक्रिया पार पडण्याच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षणासाठी भाक्षी रोड येथील गुरु प्रसाद मंगल कार्यालय येथे मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी म्हणून आदेशित करण्यात आले होते. तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडणार असल्याने ११ जानेवारी रोजी पारित केलेल्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहून मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी म्हणून निवडणूक केंद्रांवर जाण्यासाठी टाळाटाळ न करता हजर राहून निवडणूक प्रक्रिया पार पाडणे कायद्याने बंधनकारक होते.मात्र तब्बल ५१ कर्मचार्‍यांनी गैरहजर राहून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली. संबंधित शिक्षकांना नोटीस बजावणेकामी कोणताही हलगर्जीपणा केल्यास अथवा टाळाटाळ केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० चे कलम १३४ अन्वये कारवाई करण्याचा इशारा गुप्ता यांनी दिला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक