नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या सूचनेनुसार राज्याचे परिवहन उपआयुक्तांच्या आदेशान्वये हाती घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वाहन-वाहनचालक तपासणी मोहिमेंतर्गत नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने दुसºया दिवशी मंगळवारी (दि.१९) शहरात बेशिस्त व नियमबाह्या वाहतूक करणाºया वाहनचालकांविरोधाता मोहिम सुरू केली आहे. शहरातून जाणाºया राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर सकाळी अकरा वाजेपासून चार पथके ठिकठिकाणी नियुक्त करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी एकूण १५० गुन्हे आरटीओकडून दाखल करण्यात आले होते. रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार आॅगस्ट महिन्यात प्रादेशिक परिवहन विभागाकडून राबविली गेलेली वाहन-वाहनचालक तपासणी व कार्यवाहीची मोहीम कुचकामी ठरली. त्याचा वाहनचालकांवर कुठलाही परिणाम झाला नाही. परिणामी रस्ता सुरक्षेत सुधार होऊ शकला नसल्याचा निष्कर्ष काढत संपूर्ण राज्यात पुन्हा प्रभावीपणे कार्यवाहीची मोहीम राबविण्याची सूचना केली. या सूचनेनुसार शहरात अनुज्ञप्ती वैधता, विमा प्रमाणपत्र तपासणी, हेल्मेट, सीटबेल्ट वापर टाळणे, वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे, नियमबाह्य नंबर प्लेट, उत्पादकांकडून वाहनांना असलेले दिवे बदलून प्रखर दिवे बसविणे, मल्टी टोन हॉर्नचा वापर, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी-माल वाहतूक आदी वाहतुकीचे नियमभंग करणारे मुद्दे लक्षात घेऊन राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर वाहनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेसाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून तीन ते चार विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. मुंबई-आग्रा महामार्गावर मुंबई नाका, जुना आडगाव नाका, गरवारे पॉइंट आदी ठिकाणी तसेच नाशिक-औरंगाबाद महामार्गावरही विविध चौफुलींवर फिरत्या गस्त पथकाकडून नियमबाह्य वाहतूक करणाºया वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवारपर्यंत (दि.२२) मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली.
‘आरटीओ’ची दुसºया दिवशी कारवाई सुरू : राज्य-राष्ट्रीय महामार्गांवर पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 14:21 IST
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या सूचनेनुसार राज्याचे परिवहन उपआयुक्तांच्या आदेशान्वये हाती घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वाहन-वाहनचालक तपासणी मोहिमेंतर्गत नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने दुसºया दिवशी मंगळवारी (दि.१९) शहरात बेशिस्त व नियमबाह्या वाहतूक करणाºया वाहनचालकांविरोधाता मोहिम सुरू केली
‘आरटीओ’ची दुसºया दिवशी कारवाई सुरू : राज्य-राष्ट्रीय महामार्गांवर पथक
ठळक मुद्दे मोहिमेसाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून तीन ते चार विशेष पथक नियुक्त . मुंबई-आग्रा महामार्गावर मुंबई नाका, जुना आडगाव नाका, गरवारे पॉइंट पहिल्या दिवशी एकूण १५० गुन्हे आरटीओकडून दाखल