पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:46 IST2018-05-17T00:46:07+5:302018-05-17T00:46:37+5:30

नाशिक : येवला पंचायत समितीच्या आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कठोर निर्णय घेत पाच कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे अधिकारी-कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे.

Action for suspension of five employees | पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

ठळक मुद्देयेवला : पंचायत समितीच्या आढावा बैठकीत अधिकाºयांना दणकाया कारवाईमुळे अधिकारी-कर्मचाºयांचे धाबे दणाणले

नाशिक : येवला पंचायत समितीच्या आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कठोर निर्णय
घेत पाच कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे अधिकारी-कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांच्या उपस्थितीत येवला येथील महात्मा फुले नाट्यगृहात आढावा बैठक घेण्यात
आली. यावेळी डॉ. गिते यांनी कुपोषणाबाबत सर्व यंत्रणेला मार्गदर्शन केले. त्यांनी धडक तपासणी मोहीम राबवून केलेल्या तपासणीत येवला तालुक्यातील खिर्डीसाठे येथील कंत्राटी ग्रामसेविका अर्चना आव्हाड २०१२ पासून अनधिकृत रजेवर असल्याची बाब बैठकीत उघडकीस आली.  याबाबत सदर ग्रामसेविकेस वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मार्च २०१५ मध्ये अंतिम नोटीस बजावूनदेखील सदर ग्रामसेविकेने कोणताही खुलासा सादर केला नाही. त्यामुळे अनधिकृत रजेवर असलेल्या ग्रामसेविका आव्हाड यांना सेवामुक्त करण्यात आले. तसेच कुसुमाडी दगडीचा माळ, नायगव्हाण, धामोडे व नगरसूल येथील अंगणवाडी बांधकामात अनियमितता असणाºया व यासाठी जबाबदार असणाºया बांधकाम विभागातील तत्कालीन शाखा अभियंता व्ही. बी. वाईकर (सेवानिवृत्त), के. ई. उशीर व पी. एम. सोनवणे या तिघांवर तत्काळ फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना गिते यांनी दिल्या.
सोमठाण देश येथील सिंचन विहीर पूर्ण असून व मोजमाप पुस्तिका भरूनही अद्याप बिल सादर न करणाºया ग्रामसेवकाबाबत ग्रामपंचायतीमध्ये भेट देऊन व संबंधित लाभार्थीकडून माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे अनधिकृत गैरहजर असलेल्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता थविल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश गटविकास अधिकाºयांना देण्यात आले.
बैठकीच्या सुरु वातीलाच ग्राम बालविकास केंद्र, तालुकास्तरीय प्रशिक्षण, आरोग्य व आहारसंहिता याबाबत डॉ. गिते यांनी आढावा घेतला. जिल्हा व तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या प्रशिक्षणाचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच ग्रामसेवकांनाही याबाबत प्रशिक्षण देण्याचे निर्देश गिते यांनी दिले. मे महिन्यात अंगणवाडी सेविकांना सुट्या घ्यावयाच्या असतील तर त्यांना मुभा असून, ज्या अंगणवाडी सेविकांना ग्राम बालविकास केंद्राचे काम करावयाचे असेल त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काम करावे, असेही डॉ. गिते म्हणाले.  माहिती घेऊन कारवाईच्या सूचना सोमठाण देश येथील सिंचन विहीर पूर्ण असून, मोजमाप पुस्तिका भरूनही अद्याप बिल सादर न करणाºया ग्रामसेवकाबाबत ग्रामपंचायतीमध्ये भेट देऊन व संबंधित लाभार्थीकडून माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे अनधिकृत गैरहजर असलेल्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता थविल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश गटविकास अधिकाºयांना देण्यात आले.

Web Title: Action for suspension of five employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक