नाशिक : उच्च न्यायालयाचे आदेशान्वये महानगरपालिकेने सुरू केलेली अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई शहरात अंतीम टप्प्यात पोहचली आहे. बोटावर मोजण्याइतके धार्मिक स्थळे आज हटवून कारवाईला पुर्णविराम पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून दिला जाणार आहे. शहरात आज सकाळी पुर्व विभागातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंजमाळमधील पंचशीलनगरमधून मोहिमेला सुरूवात करण्यात आली. मोहिमेदरम्यान, येथील धार्मिक स्थळ शांततेत हटविले गेले. यावेळी परिसरातील नागरिकांनी देखील पालिकेच्या पथकाला सहकार्य के ल्याने येथील कारवाई तत्काळ पुर्ण झाली. त्याचप्रमाणे पथकाने आझादनगर वडाळानाका येथील समांतर रस्त्यालगतचे धार्मिक स्थळही हटविले. तेथून पालिकेच्या पथकाने मोर्चा मुंबईनाका चौकातील धार्मिक स्थळाकडे वळविला. येथे पालिकेचा लवाजमा येऊन पोहचला; मात्र परिसरातील नागरिकांनी व भाविकांनी धार्मिक स्थळाचे बांधकाम काढून घेण्यास सुरूवात केली. धार्मिक स्थळाभोवतालचे शेड वगेैरे तत्सम वस्तू नागरिकांनी काढून घेतल्या. तत्पुर्वी विधिवत प्रार्थनादेखील करण्यात आली. नागरिकांच्या सहकार्यामुळे येथील कारवाईदेखील अवघ्या तासाभरात आटोपली. येथून पालिकेचे एक पथक सातपूर विभागाच्या हद्दीत दाखल झाले आहे. मोहिमेला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पुरविण्यात आला आहे.दहा ते बारा दिवसांत महपालिकेने १७०हून अधिक अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली आहे. मोहीम शेवटच्या टप्प्यात सुरू असून संध्याकाळी मोहीम संपणार असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी सांगितले.
अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई नाशिकमध्ये अंतीम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 13:42 IST
नाशिक : उच्च न्यायालयाचे आदेशान्वये महानगरपालिकेने सुरू केलेली अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई शहरात अंतीम टप्प्यात पोहचली आहे. बोटावर मोजण्याइतके धार्मिक स्थळे आज हटवून कारवाईला पुर्णविराम पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून दिला जाणार आहे. शहरात आज सकाळी पुर्व विभागातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंजमाळमधील पंचशीलनगरमधून मोहिमेला सुरूवात करण्यात आली. मोहिमेदरम्यान, येथील ...
अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई नाशिकमध्ये अंतीम टप्प्यात
ठळक मुद्देअनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई शहरात अंतीम टप्प्यात पोहचलीदहा ते बारा दिवसांत महपालिकेने १७०हून अधिक अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई