खंडोबा टेकडीवर निर्भया पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:12 IST2019-06-30T00:11:44+5:302019-06-30T00:12:17+5:30
देवळाली येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या खंडेराव टेकडी परिसरात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान अश्लील चाळे करत असलेल्या प्रेमीयुगुलांवर पोलिसांच्या निर्भया पथकाने कारवाई केली.

खंडोबा टेकडीवर निर्भया पथकाची कारवाई
देवळाली कॅम्प : देवळाली येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या खंडेराव टेकडी परिसरात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान अश्लील चाळे करत असलेल्या प्रेमीयुगुलांवर पोलिसांच्या निर्भया पथकाने कारवाई केली.
खासगी व सार्वजनिक ठिकाणी महिलांना विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते, या हेतूने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पुढाकाराने पुनर्रचना करण्यात आलेल्या निर्भया पथकातील साध्या वेशातील पोलीस व महिला अधिकाऱ्यांनी येथे आढळलेल्या काही प्रेमीयुगुलांना ताब्यात घेत देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे आणले. त्या ठिकाणी त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. या कारवाईने या परिसरातील नागरिक व पर्यटकांनी निर्भया पथकाचे अभिनंदन केले आहे. लॅमरोड व विहितगाव यांना जोडणाºया मथुरा रोड परिसरात कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. शहरातील अन्य भागात टवाळखोरांना पोलिसांच्या निर्भया पथकाकडून कारवाईमुळे चाप बसला आहे.