निर्भया पथकाकडून ६० ठिकाणी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 23:23 IST2019-10-22T23:21:49+5:302019-10-22T23:23:07+5:30
नाशिक : गेल्या महिनाभरात निर्भया पथकाकडून नाशिकरोडसह देवळाली परिसरात सुमारे विविध ठिकाणी जोडीने फिरणाऱ्या व लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करणाऱ्यांविरोधात सुमारे ६० ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.

निर्भया पथकाकडून ६० ठिकाणी कारवाई
ठळक मुद्दे मुंबई पोलीस कायद्यानुसार सुमारे ६० प्रकरणे दाखल
नाशिक : गेल्या महिनाभरात निर्भया पथकाकडून नाशिकरोडसह देवळाली परिसरात सुमारे विविध ठिकाणी जोडीने फिरणाऱ्या व लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करणाऱ्यांविरोधात सुमारे ६० ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.
यासंबंधी माहिती देताना निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक श्रद्धा गंधास यांनी सांगितले की, गेल्या ३० दिवसांत निर्भया पथकाने नाशिकरोडसह देवळाली कॅम्प भागातील विविध ठिकाणी भेटी देत मुंबई पोलीस कायद्यानुसार सुमारे ६० प्रकरणे दाखल केली.