दांडी बहाद्दरांवर होणार कारवाई

By Admin | Updated: May 29, 2014 00:17 IST2014-05-28T23:39:45+5:302014-05-29T00:17:55+5:30

सरकारी प्रशिक्षण घेणे अनिवार्य

Action on Dandi Bahadar | दांडी बहाद्दरांवर होणार कारवाई

दांडी बहाद्दरांवर होणार कारवाई

सरकारी प्रशिक्षण घेणे अनिवार्य
नाशिक : पुणे येथील यशदा या सरकारी प्रशिक्षणासाठी नामनिर्देशित केलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रशिक्षणास उपस्थित न राहता दांडी मारल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे.
यासंदर्भात नुकतेच एक परिपत्रक राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पाठविण्यात आले आहे. सरकारी प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर या प्रशिक्षणासाठी संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना त्या त्या विभागांच्या प्रमुखांनी पाठविणे व त्यांची नावे कळविणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र तरीही प्रशिक्षणासाठी जाण्यास काही अधिकारी/कर्मचारी इच्छुक नसल्याचे तसेच काही कार्यालय/विभागप्रमुख/कर्मचारी यांना कार्यमुक्त करीत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे प्रशिक्षणासाठी नामनिर्देशित करण्यात आलेले अधिकारी/कर्मचारी यांनी प्रशिक्षणासाठी सक्तीने उपस्थित राहणे गरजेचे आहे. प्रशिक्षणासाठी नामनिर्देशित करण्यात आलेले अधिकारी/कर्मचारी यांना संबंधित विभागप्रमुख यांनी कार्यमुक्त करणे सक्तीचे राहील. प्रशिक्षणासाठी नामनिर्देशित करण्यात आलेले अधिकारी/कर्मचारी यांना काही अतिमहत्त्वाच्या कारणास्तव प्रशिक्षणास उपस्थित राहणे शक्य नसेल, तर त्याऐवजी पर्यायी अधिकार्‍यांची नावे देणे संबंधित विभागांना सक्तीचे राहील. यापुढे दरवर्षी वेतनवाढ देताना अधिकारी व कर्मचार्‍यांनी नेमून दिलेले प्रशिक्षण पूर्ण केले किंवा कसे याची पडताळणी करणे आवश्यक राहील. तसेच सर्व मंत्रालयीन विभागांनी प्रस्तुत परिपत्रक त्यांच्या अधिपत्याखालील सर्व विभागप्रमुख/कार्यालयप्रमुख यांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे परिपत्रकात प्रधान सचिव डॉ. भगवान सहाय यांनी स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Action on Dandi Bahadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.