पीडितांना न्याय देण्यासाठी कृती समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:37 IST2020-01-14T00:06:18+5:302020-01-14T01:37:03+5:30
दरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाउसमध्ये गुरुवारी (दि.९) गुंडांच्या टोळीने मद्यधुंद अवस्थेत हवेत गोळीबार करत डीजे आॅपरेटर असलेल्या दोघा तरुणांना अमानुषपणे मारहाण करत त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणाचे शहरात पडसाद उमटत आहेत.

डॉ. सुरेश जगदाळे यांच्याशी चर्चा करताना डॉ. संजय अपरांती, तानाजी जायभावे, शरद अहेर, राजेंद्र बागुल, हेमलता पाटील, बजरंग शिंदे, दीपक डोके, सुरेश मारू आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते.
नाशिक : दरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाउसमध्ये गुरुवारी (दि.९) गुंडांच्या टोळीने मद्यधुंद अवस्थेत हवेत गोळीबार करत डीजे आॅपरेटर असलेल्या दोघा तरुणांना अमानुषपणे मारहाण करत त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणाचे शहरात पडसाद उमटत आहेत.
या अमानवी घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकवटले असून, सोमवारी सर्वपक्षीय बैठकीत शनिवारी (दि.१८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत पीडीत तरुणांना न्याय मिळावा याबरोबरच आमदार देवयानी फरांदे या टवाळांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठी शनिवारी मोर्चा काढण्याचा निर्णय शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करत पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी केली.
घडलेली घटना अत्यंत अमानवीय आणि निंदनीय आहे. मी या घटनेचा निषेध करते. घडलेल्या घटनेतील आरोपींशी माझा कोणताही संबंध नाही. मात्र, तो जोडून राजकारण करण्याचादेखील प्रकार सुरू आहे. तोसुध्दा निषेधार्ह आहे. मंगळवारी (दि.१४) मी यासंदर्भात माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. - आमदार देवयानी फरांदे