नियमभंग करणाºया नागरिकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:18 IST2020-08-19T22:00:11+5:302020-08-20T00:18:36+5:30
देवळा : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दोनशे पार झाली असून, त्यात सातत्याने वाढ होत असल्यामुळे कोरोनाविषयी बेफिकिरी दाखवत नियमांचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर पोलिसांनी पाच कंदील परिसरात मोहीम राबवत दंडात्मक कारवाई केली. देवळा नगरपंचायतीने शहरात कोरोनाबाबत नियमांचे पालन न करणाºया नागरिकांवर कारवाई करत ६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला असून, आतापर्यंत २५ हजार रूपयांचा दंड वसूल झाला असल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली आहे.

नियमभंग करणाºया नागरिकांवर कारवाई
देवळा येथील पाच कंदील चौकात कोरोना संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांवर कारवाई करताना पोलीस व नगरपंचायतीचे कमर्चारी.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळा : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दोनशे पार झाली असून, त्यात सातत्याने वाढ होत असल्यामुळे कोरोनाविषयी बेफिकिरी दाखवत नियमांचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर पोलिसांनी पाच कंदील परिसरात मोहीम राबवत दंडात्मक कारवाई केली. देवळा नगरपंचायतीने शहरात कोरोनाबाबत नियमांचे पालन न करणाºया नागरिकांवर कारवाई करत ६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला असून, आतापर्यंत २५ हजार रूपयांचा दंड वसूल झाला असल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली आहे.
शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या नियमितपणे वाढत असून, देवळा शहर कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण मोठे असल्यामुळे थोडाफार दिलासा मिळत आहे. देवळा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातदेखील नागरिक गंभीर असून, शासनाने सुचविलेल्या नियमांचे पालन करताना दिसत आहे. मात्र काही बेफिकीर युवक व नागरिक कारण नसताना आपल्या दुचाकीवरून तोंडाला मास्क न लावता भटकत असतात. मागील चार महिन्यात पोलिसांनी व नगरपंचायतीने अधूनमधून कारवाई केल्यामुळे अशा बेजबाबदार नागरिकांना शिस्त लागल्याचे चित्र दिसून येत होते. परंतु आठवडाभरात पुन्हा परिस्थिती जैसे थे होत होती. आरोग्य विभाग, पोलीस व महसूल यंत्रणा घेत असलेल्या परिश्रमामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या सध्या आटोक्यात असल्याचे चित्र दिसत आहे.पालिकेकडून एका दिवसात ६ हजार २०० रुपयांचा दंड वसूलदेवळा नगरपंचायत प्रशासनामार्फत नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत; मात्र नागरिकांकडून मास्क न वापरणे, सामाजिक अंतर, रस्त्यावर थुंकणे आदी नियमांचे होणारे उल्लंघन चिंताजनक आहे. नगरपंचायत प्रशासनाने बुधवारी शहरातील पाच कंदील, निमगल्ली व बाजारपट्टी परिसरात नियमांचे पालन न करणाºया नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून ६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.