नियम न पाळल्यास लॉन्स चालकांसह आयोजकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 11:17 PM2021-02-23T23:17:42+5:302021-02-24T00:42:15+5:30

पंचवटी : राज्यात कोरोनाचचा संसर्ग वाढत चालल्याने वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मंगल कार्यालय तसेच लॉन्स चालकांना नियम घालून दिले त्याचे पालन करून कोरोना संसर्ग टाळावा अन्यथा संबधित आयोजक व लॉन्स चालकावर गुन्हे दाखल करत दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Action against organizers including lawns drivers for non-compliance | नियम न पाळल्यास लॉन्स चालकांसह आयोजकांवर कारवाई

नियम न पाळल्यास लॉन्स चालकांसह आयोजकांवर कारवाई

Next
ठळक मुद्देलॉन्स, मंगल कार्यालय चालकांची पोलिस ठाण्यात बैठक

पंचवटी : राज्यात कोरोनाचचा संसर्ग वाढत चालल्याने वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मंगल कार्यालय तसेच लॉन्स चालकांना नियम घालून दिले त्याचे पालन करून कोरोना संसर्ग टाळावा अन्यथा संबधित आयोजक व लॉन्स चालकावर गुन्हे दाखल करत दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
पंचवटी पोलिस ठाण्यात मंगळवारी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली लॉन्स मंगल कार्यालय व सभागृह चालकांची बैठक झाली त्या बैठकीत जाधव यांनी संबंधितांना सूचना वजा कारवाई करण्याचे संकेत दिले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांची माहिती देत संसर्ग रोखण्यासाठी लग्न सोहळ्याला १०० लोकांना परवानगी असून लग्नात प्रत्येकाने मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, गोरज मुहुर्तावर विवाह टाळणे, पोलीस परवानगीशिवाय कार्यालय अथवा लॉन्स उपलब्ध करुन देऊ नये, जे आयोजक लॉन्स, मंगल कार्यालय, सभागृह चालक नियम पाळणार नाही त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
बैठकीला पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत, अशोक साखरे, हवालदार शेखर फरताळे, अंकुश सोनजे, जितू राक, धर्मेंद्र खैरे सागर अभंग आदींसह लॉन्स, मंगल कार्यालय चालक उपस्थित होते.

Web Title: Action against organizers including lawns drivers for non-compliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.