मनपा अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

By Admin | Updated: October 3, 2016 00:29 IST2016-10-03T00:21:40+5:302016-10-03T00:29:52+5:30

मनपा अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Action against municipal corporation | मनपा अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

मनपा अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

नाशिक : महापालिकेच्या खाते प्रमुखांच्या बैठकीत अर्धवट माहिती सादर करणे आणि टिप्पणी तयार न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिला आहे. खातेप्रमुखांच्या अर्धवट माहितीमुळे सविस्तर आढावा घेता येत नाही आणि वेळेचा अपव्यय होत असल्याने हा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
महापालिका आयुक्तांकडे खातेप्रमुखांच्या आढावा बैठका होतात. मात्र या बैठकींमध्ये विभाग प्रमुखांकडून टिप्पणी तयार न करणे, अर्धवट माहिती सादर करणे, आकडेवारीमध्ये तफावत असणे, विषयांचा अभ्यासच नसणे असे अनेक प्रकार आयुक्तांच्या निरीक्षणात आढळले. त्यामुळे आयुक्तांनी खातेप्रमुखांकरिता आदेश जारी केले आहे. त्यानुसार विभागप्रमुखांनी संबंधित विषयाची टिप्पणी व प्रेझेंटेशनचा अभ्यास करून वेळेवर उपस्थित राहावे, बैठकीच्या एक दिवस अगोदर टिप्पणी आयुक्तांंना सादर करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या असून, आदेशाचे पालन न केल्यास संबंधित विभाग प्रमुखांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी आदेशात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Action against municipal corporation