पंचवटी परिसरात ८६ दुचाकीस्वारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:09 IST2020-07-04T23:08:13+5:302020-07-04T23:09:56+5:30
पंचवटी : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. एकाच दिवशी जवळपास ८६ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे.

पंचवटी परिसरात ८६ दुचाकीस्वारांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. एकाच दिवशी जवळपास ८६ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर दुचाकी घेऊन डबलशिट तसेच विनामास्क लावून फिरत असल्याचे दिसून आल्याने सायंकाळी दिंडोरीरोडवर दुचाकीस्वार नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली.
पंचवटी पोलीस ठाण्यामार्फत दिंडोरीरोडवर वाहन तपासणी करण्यात आली. त्यावेळी अनेक बेशिस्त नागरिक विनाकारण दुचाकीवर तोंडाला मास्क न लावता डबलशिट फिरताना आढळून आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक सत्यवान पवार, संजय वानखेडे, सुरेश नरवडे, शेखर फरताळे, प्रजोक्त जगताप, महेश साळुंके आदींनी कारवाई केली आहे.