मुखेड परिसरातील ४२ वीजचोरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 23:01 IST2020-01-09T23:00:11+5:302020-01-09T23:01:19+5:30

मुखेड वीज वितरण कक्षांतर्गत केलेल्या विशेष मोहिमेत गुरुवारी (दि. ९) ४२ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. यापुढे-देखील मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे कक्ष अभियंता अमोल राजोळे यांनी स्पष्ट केले.

Action against 4 power thieves in Mukhed area | मुखेड परिसरातील ४२ वीजचोरांवर कारवाई

मुखेड परिसरात राबविण्यात आलेल्या वीजचोरीविरोधातील मोहिमेत सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जप्त केलेले वीजचोरीसाठीचे साहित्य.

देशमाने : मुखेड वीज वितरण कक्षांतर्गत केलेल्या विशेष मोहिमेत गुरुवारी (दि. ९) ४२ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. यापुढे-देखील मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे कक्ष अभियंता अमोल राजोळे यांनी स्पष्ट केले.
कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, उपविभागीय अभियंता मंगेशकुमार प्रजापती यांच्या नेतृत्वाखाली येवला ग्रामीण उपविभागातील कक्ष अभियंता राजोळे, गवळी, चौधरी, गिते, गुठळे, सौ. राठोड आदींच्या पथकाने ही कारवाई केली. कार्यवाही झालेल्या ग्राहकांनी वीजचोरीची देयके पुढील न्यायालयीन कार्यवाही टाळण्यासाठी वेळेत भरावी. त्याचप्रमाणे अधिकृतपणे मीटर बसवून विजेचा वापर करावा. यामुळे वीजहानी टळून सर्वांना सुरळीतपणे वीजपुरवठा करता येईल, असे प्रजापती यावेळी म्हणाले.

Web Title: Action against 4 power thieves in Mukhed area