मका खरेदीला बारदानाचे ग्रहण !
By श्याम बागुल | Updated: December 1, 2018 18:19 IST2018-12-01T18:18:24+5:302018-12-01T18:19:00+5:30
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे बंपर उत्पादन देणा-या मक्याच्या उत्पादनात यंदा निम्म्याने घट झाली आहे. गेल्या वर्षी सुमारे दीड लाख क्विंटल मक्याची खरेदी करण्यात येऊनही शेवटच्या टप्प्यात काही शेतक-यांना खरेदीपासून वंचित राहावे लागले होते. ते टाळण्यासाठी यंदा १ नोव्हेंबरपासून शेतक-यांना आॅनलाइन

मका खरेदीला बारदानाचे ग्रहण !
नाशिक : जिल्ह्यात हमीभावात मका खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असून, यंदाही शेतकºयांना आॅनलाइन नोंदणी करण्याची सक्ती केल्याने जिल्ह्यातील ४९८३ शेतक-यांनी आपल्याकडील सुमारे एक लाख क्विंटल मक्याची नोंदणी केली आहे. परंतु खरेदी केलेला मका साठवणुकीसाठी खरेदी-विक्री संघांकडे बारदानाची कमतरता भासू लागल्याने आजवर फक्त ३७ शेतक-यांचा मका खरेदी करावा लागला आहे.
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे बंपर उत्पादन देणा-या मक्याच्या उत्पादनात यंदा निम्म्याने घट झाली आहे. गेल्या वर्षी सुमारे दीड लाख क्विंटल मक्याची खरेदी करण्यात येऊनही शेवटच्या टप्प्यात काही शेतक-यांना खरेदीपासून वंचित राहावे लागले होते. ते टाळण्यासाठी यंदा १ नोव्हेंबरपासून शेतक-यांना आॅनलाइन नोंदणीची सुविधा व दुसºया आठवड्यापासूनच मका खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय पणन महामंडळाने घेतला. त्यानुसार जिल्ह्यात ३० नोव्हेंबरअखेर ४,९८३ शेतक-यांनी नोंदणी केली असून, ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत देण्यात आली आहे. दिवाळीनंतर शेतकºयांनी मका काढणीला घेतल्यामुळे खुल्या बाजारातही व्यापाºयांनी मका खरेदीला सुरुवात केली असून, त्यासाठी १५०० ते १६०० रुपये क्विंटलमागे दर देण्यात आला आहे, तर केंद्र सरकारने हमीभावाने १७०० रुपये दर निश्चित केला आहे.
जिल्ह्यात मका खरेदीसाठी सिन्नर, येवला, मालेगाव व चांदवड या चार खरेदी-विक्री केंद्रांवर खरेदी सुरू केली असून, आजवर ३७ शेतकºयांचा ९३० क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. पुढच्या आठवड्यात सटाणा, देवळा, लासलगाव आदी ठिकाणी केंद्रे सुरू करण्याची तयारी जिल्हा मार्केट फेडरेशनने केली आहे. तथापि, खरेदी केलेला मका साठवणुकीसाठी यंदा शासकीय गुदामे उपलब्ध असली तरी, मका भरण्यासाठी बारदानाची कमतरता भासू लागली आहे. खरेदी केंद्रांकडे पडून असलेल्या बारदानामध्ये तूर्त उपलब्ध मका साठवणूक करून वेळ मारून नेली जात असताना खरेदी केंद्रावर आलेल्या शेतकºयांना बारदानाअभावी परत पाठविणे योग्य नसल्यामुळे काहीशा मंदगतीने खरेदी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पणन महामंडळाकडून संपूर्ण राज्यासाठी बारदानाची खरेदी केली जाते, परंतु अजुनही खरेदीची प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्यामुळे बारदानाचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा मार्केट फेडरेशनने या संदर्भात बारदानाची मागणी केली असून, येत्या दोन दिवसांत २० हजार बारदान उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी इंगळे यांनी दिली.