Acharyasurya Nando Independence of India ... | आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे...
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे...

नाशिकरोड : परिसरातील विविध शाळा, महाविद्यालय, संस्था, कार्यालय आदी ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
नवीन मराठी शाळेत स्वातंत्र दिनानिमित्त मुख्याध्यापक मंगला गोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय समिती सदस्य संजय खरोटे, सविता कुलकर्णी, स्वाती सोमवंशी, प्रभाकर रेवगडे आदी मान्यवर उपस्थित होते. उषा शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ध्वजगीत, देशभक्तीपर समूहगीत सादर केले. यावेळी सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या चिन्मय संजय खरोटे याचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुनंदा गाडे व आभार वैशाली हिरे यांनी मानले.
पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल
पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये प्राचार्य दिलीप वाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांना ध्वजप्रतिज्ञा मदन शिंदे, एनसीसी प्रतिज्ञा जयंत निकम यांनी दिली. यावेळी महापुरात व अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रेखा हिरे यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाची शपथ दिली. यावेळी शाळा समिती अध्यक्ष जयंत मोंढे, सुरेश गायधनी पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष हेमलता हळदे आदींच्या हस्ते ज्ञानयात्री या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. आभार उपप्राचार्य सुनील हिंगणे यांनी आभार मानले.
रंगुबाई जुन्नरे स्कूल
द्वारका काठेगल्ली येथील रंगुबाई जुन्नरे प्राथमिक इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापक कल्याणी अग्निहोत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी झेंडा गीत गात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
व्हिजन अकॅडमी स्कूल
जेलरोड येथील व्हिजन अकॅडमी इंग्लिश स्कूलमध्ये जेसीआयचे झोनल अध्यक्ष मयूर करवा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पूरग्रस्तांना मदत म्हणून संस्थेच्या अध्यक्ष अ‍ॅड. अंकिता मुदलियार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या. यावेळी विद्यार्थी विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत सादर केले. यावेळी मुख्याध्यापक प्रिया आठवले यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनिथा थॉमस यांनी केले. सूत्रसंचालन कविता जोशी व आभार दीपाली भट्टड यांनी मानले. यावेळी शिक्षक उपस्थित होते.
उपनगर महाराष्टÑ हायस्कूल
उपनगर येथील महाराष्टÑ हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक सुरेश घरटे, पार्वतीबाई नायर, प्राथमिकच्या मुख्याध्यापक तारा मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शारदा विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सुभाषचंद्र वैद्य, संस्थेचे उपाध्यक्ष आर. एन. घुगे उपस्थित होते. यावेळी महापुरात मृत्युमुखी पडलेले व शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.
आदर्श विद्यामंदिर
आदर्श विद्यामंदिरमध्ये कवी किशोर पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मनिषा विसपुते व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक रमेशचंद्र औटे, संस्थेचे अध्यक्ष मधुकर सातपुते, निंबा विसपुते, भिमराव पोरजे, भारती शिंदे आदि उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन ज्योत्स्रा पाटील यांनी केले.

Web Title:  Acharyasurya Nando Independence of India ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.