आचार्य दोंदे पुण्यतिथी

By Admin | Updated: October 9, 2016 00:01 IST2016-10-09T00:01:34+5:302016-10-09T00:01:54+5:30

आचार्य दोंदे पुण्यतिथी

Acharya Donde Punyathithi | आचार्य दोंदे पुण्यतिथी

आचार्य दोंदे पुण्यतिथी

पेठ : प्राथमिक शिक्षकांचे प्रेरणास्थान असलेले आचार्य दोंदे यांची पुण्यतिथी प्राथमिक शिक्षक भवन, प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभागृहात चेअरमन तथा आचार्य दोंदे ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष अहिरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली़
यावेळी दोंदे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष सुभाष आहिरे यांनी मनोगत व्यक्त केले.आचार्य दोंदे यांनी मुंबई महानगरपालिकेत ३१ वर्ष नगरसेवक, त्यांनतर महापौर व आमदारकी सुद्धा भूषवली होती. या शिक्षक नेत्याचे ७ आॅक्टोबर १९६२ रोजी निधन झाले. यावेळी अशोक ठाकरे, अनिल बाविस्कर, श्रीकांत निकम, श्रीरंग गीते, खंडू शिंदे, महेश गीते, बबन बडवर, सोनार, बाळासाहेब मुरकुटे, श्रीमती वाघ, चासकर, गुंजाळ यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
(वार्ताहर )

Web Title: Acharya Donde Punyathithi