युवकाच्या खूनप्रकरणी आरोपीला कोठडी

By Admin | Updated: July 22, 2015 00:54 IST2015-07-22T00:53:59+5:302015-07-22T00:54:12+5:30

युवकाच्या खूनप्रकरणी आरोपीला कोठडी

Accused of murdering youth | युवकाच्या खूनप्रकरणी आरोपीला कोठडी

युवकाच्या खूनप्रकरणी आरोपीला कोठडी

नाशिक : पूर्ववैमनस्यातून शेजारच्या तरुणाचा खून करून फरार झालेल्या आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
पंचवटीतील वडनगर भागात रविवारी रात्री पूर्ववैमनस्यातून हा खून झाला होता. त्यामध्ये पेंटिंग काम करणाऱ्या शंकर शिवाजी गवारे (२८) याच्या चुलत भावाचे शेजारी राहणाऱ्या तिघा भावांसोबत भांडण झाले होते. ते दुपारीच सोडवण्यात आले होते, परंतु रात्री पुन्हा त्याच कारणावरून भांडण झाल्यानंतर संशयित समीर बबन राक्षे याने शंकरला बाहेर बोलावून घेतले. काही कळण्याच्या आतच शंकरवर वार करण्यात आले. त्यात शंकरचा मृत्यू झाला होता. यानंतर समीर फरार होता. सोमवारी रात्री पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Accused of murdering youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.