अपघातप्रकरणी आरोपीस कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:43 IST2019-05-08T00:43:45+5:302019-05-08T00:43:56+5:30
लासलगाव : शांतीनगर चौफुली अपघातप्रकरणी निफाड न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. कोचर यांनी आरोपी अंबादास किसन गुंजाळ यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

अपघातप्रकरणी आरोपीस कारावास
लासलगाव : शांतीनगर चौफुली अपघातप्रकरणी निफाड न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. कोचर यांनी आरोपी अंबादास किसन गुंजाळ यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी अंबादास गुंजाळ, रा,शिवळी याने २६ नोव्हेंबर २०१६ रोजी फिर्यादी समाधान लक्ष्मण कापसे, रा, नैताळे हे निफाडवरून नैताळे येथे जाण्यासाठी रोडच्या कडेला उभे असताना आरोपीने भरधाव मोटारसायकलने त्यांना धडक दिली. याप्रकरणी निफाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिवाजी माळी यांनी करून निफाड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मुख्य न्यायदंडाधिकारी कोचर यांनी आरोपीस दोषी ठरवून एक महिना कारावास व ५०० रु पये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सरकारी वकील राजीव एम. तडवी यांनी काम पाहिले.