सिडको : अनेकदा तक्रारी करूनही झाडांच्या धोकादायक फांद्या तोडल्या जात नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी सर्वच नगरसेवकांनी प्रभागसभेत संताप व्यक्त केला. दुसरीकडे मात्र मनपा अधिकारी व स्मशानभूमी ठेकदार यांच्या संगनमताने सिडको भागात सर्रासपणे वृक्षतोड केली जात असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत मनपाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. याबरोबरच उद्यान, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच स्मशानभूमी ठेकेदार यांची एकत्रित टोळी सक्रिय झाली असून, यांच्याकडून विनापरवाना वृक्षतोड करण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी नगरसेवकांनी केला. सिडको प्रभागाची सभा प्रभाग सभापती दीपक दातीर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नगरसेवक रत्नमाला राणे व सुवर्णा मटाले यांनी प्रभागात विद्युत विभागाची कामे सुरू असताना अधिकाºयांकडून कळविले जात नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. अशाच प्रकारे सिडकोतील सर्व विभागांतील प्रभागात मनपाशी संबंधित विकासकामे तसेच सोयी-सुविधांची कामे करताना अधिकारी नगरसेवकांना न सांगताच परस्पर कामे करीत असल्याचा आक्षेपही नगरसेवक मटाले व राणे यांनी घेतला.
वृक्षतोडीत अधिकारी, ठेकेदार यांची टोळी असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 01:24 IST
अनेकदा तक्रारी करूनही झाडांच्या धोकादायक फांद्या तोडल्या जात नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी सर्वच नगरसेवकांनी प्रभागसभेत संताप व्यक्त केला. दुसरीकडे मात्र मनपा अधिकारी व स्मशानभूमी ठेकदार यांच्या संगनमताने सिडको भागात सर्रासपणे वृक्षतोड केली जात असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत मनपाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.
वृक्षतोडीत अधिकारी, ठेकेदार यांची टोळी असल्याचा आरोप
ठळक मुद्देअधिकारी प्रभागातील कामे लोकप्रतिनिधींना न सांगताच परस्पर करतात