जुनी शेमळी पुलाजवळील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 21:59 IST2021-10-14T21:57:47+5:302021-10-14T21:59:00+5:30
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथील सटाणा - मालेगाव रस्त्यावरील पुलाजवळ असलेल्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली असून दोन दिवसापासून दोन मोटारसायकलवरून एक महिला व एक पुरुष पडल्यामुळे त्यांना जबरदस्त मार लागला. पुलाजवळील रहिवासी व गावातील ग्रामस्थांच्या सहकाऱ्यांनी जखमींना तातडीने सटाणा येथे दाखल करण्यात आले. या पुलाचे काम नवीनच झाले असून पुलाजवळच खड्डा पडल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे.

जुनी शेमळी येथील याच पुलाजवळील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली आहे. (छाया : गणेश बागुल)
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथील सटाणा - मालेगाव रस्त्यावरील पुलाजवळ असलेल्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली असून दोन दिवसापासून दोन मोटारसायकलवरून एक महिला व एक पुरुष पडल्यामुळे त्यांना जबरदस्त मार लागला. पुलाजवळील रहिवासी व गावातील ग्रामस्थांच्या सहकाऱ्यांनी जखमींना तातडीने सटाणा येथे दाखल करण्यात आले.
या पुलाचे काम नवीनच झाले असून पुलाजवळच खड्डा पडल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. सटाणा मालेगाव रस्त्यावर रहदारी जास्त असल्यामुळे मालेगाव कडून उतार असल्यामुळे हा खड्डा लक्षात येत नाही लहान-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी, खड्ड्यांमुळे व रस्ता खराब असल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अचानक रस्त्यात खड्डा असल्यामुळे वाहनधारकांची चलबिचल होत आहे.
या पुलाचे काम आत्ताच झाले असून पुलाजवळील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी खड्डा वाहन धारकांच्या लक्षात येत नाही तरी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन याची दुरुस्ती करावी.
- कैलास खैरनार, शिवसेना गणप्रमुख, ठेंगोडा.