सिन्नर-शिर्डी मार्गावर अपघातात तरूण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 14:29 IST2019-09-23T14:29:25+5:302019-09-23T14:29:37+5:30
सिन्नर : सिन्नर-शिर्र्डी रस्त्यावर ओम्नी कारला अज्ञात ट्रकने धडक दिल्याने तरूण ठार झाल्याची घटना घडली.

सिन्नर-शिर्डी मार्गावर अपघातात तरूण ठार
सिन्नर : सिन्नर-शिर्र्डी रस्त्यावर ओम्नी कारला अज्ञात ट्रकने धडक दिल्याने तरूण ठार झाल्याची घटना घडली. तर महिलेसह दोघे जखमी झाले आहेत. खंडू भास्कर उगले (वय ३४, रा. फर्दापूर, ता. सिन्नर) असे मृत तरूणाचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी मृत खंडू उगले यांच्या आईचे निधन झाले. अवघ्या चार दिवसात मायलेकीचे निधन झाल्याने फर्दापूर परिसरात शोककळा पसरली आहे. शनिवारी (दि. २१) सायंकाळी सातच्या सुमारास सिन्नरहून फर्दापूर ला जाणारी ओम्नी (एम.एच. १५, सी.एम. ०४४३) भोकणी फाट्यावर उभी असताना, शिर्डी कडून सिन्नरला जाणाऱ्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. यात खंडू उगले जागीच ठार झाले. तर फर्दापूर येथील त्याची मावस बहीण वंदना शिवाजी जेऊघाले (३२) या जखमी झाल्या आहेत. ओम्नी चालक संदीप दळवी यांना दिलेल्या फिर्यादी वरून वावी पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रकचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस मित्र म्हणून खंडू उगले यांचा अनेकदा वावी पोलिसांनी गौरव केला होता. मनिमळाऊ स्वभावाच्या खंडूचे अपघाती निधन झाले, तर तीन दिवसांपूर्वी आई ही मृत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.