अपघाताचे खोटे फोटो व्हायरल करणाऱ्या तरूणावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 14:14 IST2019-12-14T14:14:33+5:302019-12-14T14:14:42+5:30
सप्तशृंगगड : गेल्या दोन दिवसांपूर्वी सप्तश्रृंगगडावरील अपघाताचे खोटे फोटो व्हायरल करणाºया तरूणाविरूद्ध कळवण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताचे खोटे फोटो व्हायरल करणाऱ्या तरूणावर गुन्हा दाखल
सप्तशृंगगड : गेल्या दोन दिवसांपूर्वी सप्तश्रृंगगडावरील अपघाताचे खोटे फोटो व्हायरल करणाºया तरूणाविरूद्ध कळवण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसºया ठिकाणी झालेल्या अपघाताचे फोटो सप्तशृंगगड परिसराचा नामोल्लेख करून सोशल मिडीयावर व्हायरल केले होते. त्यामुळे भाविक व नागरिकांमध्ये या घटनेबद्दल गैरसमज झाला होता. त्यामुळे भाविकांकडून गडावरील ग्रामस्थ, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, एस.टी.डेपो.,पोलिस अधिकारी याच्यांकडे दूरध्वनीवरून अपघाताबाबतची विचारणा करीत होते. त्यामुळे भाविकांना व ग्रामस्थांना व पोलिसांना होणारा त्रास लक्षात घेता पोलिसांनी व्हॉटसप ग्रूप वरून या तरूणाचा नबंरचा शोध घेऊन त्याला पकडण्यात यश आले. त्या तरूणाचे नाव नितिन कूडंलिक महाले राहणार नरूळ ता.कळवण येथील आहे. भाविकांना भयभीत करणाराया या तरूणाविरूद्ध कळवण पोलिसांनी भादवि ५०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खाडे, पोलिस कॉ.योगेश गवळी, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहे.