Accidental increase due to obstruction on Nashik-Aurangabad road | नाशिक-औरंगाबाद मार्गावर गतिरोधकांमुळे अपघात वाढ
नाशिक-औरंगाबाद मार्गावर गतिरोधकांमुळे अपघात वाढ

ठळक मुद्देगतिरोधकावर सफेद साइडपट्टी न भरल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.

जळगाव नेऊर : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर जळगाव नेऊर, पुरणगाव, देशमाने या ठिकाणी असलेल्या गतिरोधकांवर अपघाताची मालिका सुरूच असून, महामार्गाची दुरुस्ती करताना या ठिकाणी असलेले छोटे गतिरोधक काढून त्याठिकाणी मोठे गतिरोधक केल्याने जळगाव नेऊर, पुरणगाव, देशमाने येथील गतिरोधकावर दोन दिवसात अनेक अपघात होऊन अनेक वाहनचालक जख्मी होऊन अपंगत्व आले आहे.
येथील जंगली महाराज आश्रमाजवळील गतिरोधकावर जळगाव येथील गणेश ठोंबरे या युवकाचा अपघात होऊन नाशिक येथील सोपान हॉस्पिटलला उपचार घेत आहे. सदर महामार्गाची डागडुजी करताना ठेकेदाराने या गतिरोधकावर सफेद साइडपट्ट्या न भरल्याने गतिरोधक समजत नाही. त्यामुळे अनेक वाहने अपघाताला बळी पडत आहेत.
तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन सफेद साइडपट्ट्या भरून गतिरोधकाची उंची कमी करावी, अशी मागणी होत आहे. येत्या दोन दिवसात या गतिरोधकावर सफेद साइडपट्टी न भरल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.


Web Title:  Accidental increase due to obstruction on Nashik-Aurangabad road
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.