अपघाती मृत्युस जबाबदार वाहनचालकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 21:08 IST2019-09-03T21:07:45+5:302019-09-03T21:08:02+5:30
वणी : दुचाकीला धडक देऊन दोन लोकांच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन वाहनमालकाचा शोध घेण्यात येत आहे.

अपघाती मृत्युस जबाबदार वाहनचालकावर गुन्हा दाखल
ठळक मुद्देया प्रकरणी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वणी : दुचाकीला धडक देऊन दोन लोकांच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन वाहनमालकाचा शोध घेण्यात येत आहे.
वणी पिंपळगाव रस्त्यावरील वाघेरा डोंगर परीसरात दुचाकीला धडक दिल्याने दत्तु दशरथ शार्दुल व भिका शिवराम बोरसे यांचा अपघाती मृत्यु झाला होता. सदर अपघात प्रकरणी प्रारंभी वाहनाचा तपास सुरु असताना एम एच ४७ इ ०८६३ या वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात या दोघांचा मृत्यु झाल्याने पुढे अपघाती मृत्युस कारणीभुत प्रकरणी रोशन भिका बोरसे यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.