सुटीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू

By Admin | Updated: May 14, 2016 22:55 IST2016-05-14T22:17:31+5:302016-05-14T22:55:27+5:30

सुटीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू

Accidental death due to holidays | सुटीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू

सुटीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू


न्यायडोंगरी : भारतीय सीमा सुरक्षा दलात छत्तीसगड येथे सेवेत असलेला न्यायडोंगरी येथील जवान किरण बाळासाहेब अहेर (२६) याचे अपघाती निधन झाले. या बातमीने गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे. दुचाकीवरून पडल्याने छातीस जबर मार लागल्याने धुळे येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सुमारे तीन वर्षापूर्वी किरण अहेर सुरक्षा दलात भरती झाला होता. वर्षाभरापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. लग्नाच्या प्रथम वाढदिवस दोन दिवसांवर असताना काळाने त्याच्यावर झडप घातली. किरणच्या निधनाची बातमी परिसरात कळताच नागरिकांनी घराकडे धाव घेतली.
या वेळी परिसरातील भारतीय जवानांनी किरण यास मानवंदना देऊन अंत्यविधी करण्यात आला. या वेळी गावातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून व्यवहार बंद ठेवले होते. किरण यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रेल्वे कर्मचारी बाळासाहेब नारायण अहेर यांचा तो मुलगा होत. (वार्ताहर)

Web Title: Accidental death due to holidays