दोन रिक्षांचा अपघात; रिक्षाचालक ठार
By Admin | Updated: October 20, 2015 23:31 IST2015-10-20T23:30:48+5:302015-10-20T23:31:19+5:30
दोन रिक्षांचा अपघात; रिक्षाचालक ठार

दोन रिक्षांचा अपघात; रिक्षाचालक ठार
नाशिक : पंचवटीतील चित्रकूट सोसायटीजवळ दोन रिक्षांच्या समोरासमोर झालेल्या अपघातात शशिकांत सिसोदे (रा़ राजराजेश्वरी सोसायटी, म्हसरूळ) या रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़
रविवारी (दि़१८) दुपारी बारा वाजेच्या सुमारास रिक्षाचालक शशिकांत सिसोदे हे रिक्षा (एमएच १५, झेड ९३९४) घेऊन म्हसरूळकडे जात होते़ त्यावेळी समोरून आलेल्या रिक्षाचा (एमएच १५, झेड ८१२१) समोरासमोर अपघात झाला़ यामध्ये सिसोदे यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.