सुरगाण्याजवळ अपघातात इसम जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:48 IST2018-04-01T23:48:52+5:302018-04-01T23:48:52+5:30
सुरगाणा : दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर महाविद्यालयीन तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले.

सुरगाण्याजवळ अपघातात इसम जागीच ठार
सुरगाणा : दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर महाविद्यालयीन तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, यातील एकास जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हरिष बारूट असे मृताचे नाव आहे. येथून जवळच असलेल्या सूर्यगडजवळील चढण असलेल्या वळणावर साडेचार वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. सुरगाणा येथून एफवायबीएचे तिघे विद्यार्थी कांतिलाल केशव महाले (२०) रा. भवाडा, गिरिधर चिंतामण चव्हाण (२१) रा. बेंडवळ व नितीन लक्ष्मण महाले (१९) रा. राक्षसभुवन हे परीक्षा आटोपून मोटरसायकल क्र. एमएच १५ ई य ०७८४ वरून गावी जात होते. तर समोरून सुरगाणा येथील हरिष ऊर्फ गुड्डू केशव बारूट (४५) हे दुचाकी क्र . जीजे १९ आर १६७ वरून उंबरठाणकडून येत असताना या दोन्ही दुचाकींची समोरासमोर भीषण टक्कर झाली. या अपघातात हरिष बारूट यांच्या डोक्यास गंभीर मार बसून ते जागीच ठार झाले.