करंजखेड फाट्याजवळ अपघात; तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 18:07 IST2020-03-03T18:07:08+5:302020-03-03T18:07:35+5:30
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील करंजखेड फाटयाजवळ ट्रकची टमाटा भरलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने तीन जण जखमी झाले असून ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

करंजखेड फाट्याजवळ अपघात; तीन जखमी
वणीकडून सापुताराकडे भाताचा भुसा घेवून जाणारा ट्रक जीजे ६ अेव्ही ६१२२ या ट्रकने हरण टेकडीकडून येणाऱ्या टमाट्याने भरलेल्या ट्रॅक्टरला समोरून जोरदार धडक दिली. त्यात किरण लक्ष्मण जाधव (२०) याचा पाय फॅक्चर झाला असून छगन वाळू जाधव (२८) तसेच राजेंद्र उत्तम जाधव हे तीन जण जखमी झाले आहेत. राजेंद्र जाधव याच्या डोक्याला मार लागल्यामुळे गंभीर अवस्थेत पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे वणी- सापुतारा रस्त्यावर दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. वणी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक कैलास जाधव यांनी क्र ेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करु न वाहतूक पूर्ववत केली. वणी ते नाशिक चौपदरीकरणाचे काम धिम्या गतीने सुरु असल्यामुळे अजून किती अपघातांची वाट ठेकेदार पाहणार असल्याचा प्रश्न ग्रामस्थांत विचारला जात आहे.