कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने कसारा घाटात अपघात; अनेक प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 17:24 IST2019-11-03T17:20:10+5:302019-11-03T17:24:50+5:30
इगतपुरी : नाशिककडून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन निघालेल्या कंटेनरचे (क्र. एमएच ४६ एच २९८८) कसारा घाटात ब्रेक फेल झाल्याने ७ ते ८ गाड्यांना धडका देत अखेर एका मालवाहू ट्रकला व पाठीमागे असलेल्या गॅस टँकरला शेवटची धडक देऊन १५ मिनिटांच्या थरार नाट्यानंतर कंटेनर थांबला. मात्र आधी एकामागोमाग अनेक गाड्यांना जबर धडका दिल्याने वेगवेगळ्या गाड्यांमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे. सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने कसारा घाटात अपघात; अनेक प्रवासी जखमी
दरम्यान,शेवटची धडक गॅस ट्रँकरला दिल्यानंतर घाटातील परिस्थिती फारच बिकट बनली होती. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. आपत्ती व्यवस्थापणाचे आकाश शेलार यांनी आपल्या गाडीत जखमींना ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. ग्रामीण रु ग्णालयात उपचार करुन नऊ जखमींना नासिक येथील जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले आहे.
या महार्गावरील घाटत नेहमीच वर्दळ असते. त्यात लोखंडी सळ्या घेऊन चाललेला मोठा कंटेनर ब्रेक फेल होऊन उतार असल्याने थेट गाड्यांवर जाऊन आदळला. अपघाताची माहिती घोटी टॅबचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांना समजताच त्यांनी तात्काळ धाव घेऊन अपघातग्रस्तांना उपचारासाठीनाशिक येथील जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. यावेळी अष्टविनाक हॉस्पिटलचे हंसराज माने यांनी जखमींतील लहान मुलांची तपासणी केली. क्र ेनच्या साहाय्याने तत्काळ वाहने बाजूला करून सुमारे तीन तासानंतर घाटातील वाहतूक सुरळीत केली.