वऱ्हाडाच्या टेम्पोला हिंगणवेढे येथे अपघात

By Admin | Updated: May 11, 2017 17:27 IST2017-05-11T17:27:38+5:302017-05-11T17:27:38+5:30

तालुक्यातील शिलापुर येथून लग्न आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या टेम्पोला हिंगणवेढे येथे अपघात झाला असून या अपघातात २५ जण जखमी झाले आहेत.

Accident at Hingangate Tempo in Hinganghat | वऱ्हाडाच्या टेम्पोला हिंगणवेढे येथे अपघात

वऱ्हाडाच्या टेम्पोला हिंगणवेढे येथे अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : तालुक्यातील शिलापुर येथून लग्न आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या टेम्पोला हिंगणवेढे येथे अपघात झाला असून या अपघातात २५ जण जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्तांमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश आहे. जखमींना नाशिकच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हिंगणवेढे येथील वर आणि परळी येथील वधुचे आज शिलापुर येथे दु.१२.१५ वाजता लग्न झाले. विवाहविधी आटोपून वऱ्हाड निघाले असता एकलहऱ्याजवळील हिंगणवेढे येथील धात्रकवस्तीजवळ हा अपघात घडला. धात्रक वस्तीजवळ टेम्पोच्या समोर अचानक लहान मुलगा आल्याने त्याला वाचवण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक लावला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने टोम्पो पलटी होऊन २५ जण जखमी झाले. जखमींना नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Accident at Hingangate Tempo in Hinganghat